
सावंतवाडी : नाताळ सणानिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात 'नाताळ' संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाचे औचित्य साधून भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी विविध चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेटी देऊन ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विशाल परब म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा नेहमीच सामाजिक सलोखा जपण्यासाठी ओळखला जातो. ख्रिसमसचा सण हा केवळ एका धर्माचा नसून तो प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारा सण आहे.यावेळी विशाल परब यांचे ठिकठिकाणी स्वागत केले गेले. याप्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.










