
सावंतवाडी : तालुकास्तरावरील बाल कला क्रीडा महोत्सवात तिरोडा शाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या शाळेतील लवेश गुंडू जाधव याने १०० मीटर धावणे व उंच उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच मोठा गट समूहगीत प्रथम ,लहान गट समूहगीत द्वितीय क्रमांक व निशांत मातोंडकर गोळा फेक साठी तृतीय क्रमांक मिळवित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांनी मजल मारली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामपंचायत तिरोडा यांनी शाळेचं अभिनंदन करून भेट वस्तू देत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक जनार्दन प्रभू, पदवीधर शिक्षक दीपक राऊळ, उपशिक्षिका संगिता राळकर व सीमा सामंत,पालक,ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









