कणकवलीचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकरांचा कुडाळमध्ये सत्कार

उबाठा - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 23, 2025 21:01 PM
views 43  views

कुडाळ : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत 'शहर विकास आघाडी'च्या माध्यमातून विजय मिळवलेले नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा कुडाळमध्ये उत्साहात सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील ऐतिहासिक गांधी चौक येथे शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पारकर यांचे जंगी स्वागत केले. कणकवलीच्या राजकारणात संदेश पारकर यांनी इतर उमेदवारांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या 'शहर विकास आघाडी'ने या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील समन्वय दर्शवण्यासाठी कुडाळमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्याला दोन्ही पक्षांतील दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. यामध्ये अभय शिरसाट, मंदार शिरसाट, श्रीराम शिरसाट, अवधूत मालणकर, माजी आमदार परशुराम उपरकर, शिवाजी घोगळे, गौरीशंकर खोत, यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. सत्काराला उत्तर देताना संदेश पारकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या विजयामुळे आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.