
कणकवली : अयोध्या श्री राम मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सकल हिंदू समाज नांदगाव दशक्रोशीच्यावतीने गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नांदगावात मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे.
१ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. नांदगाव तिठा येथे श्री रामाच्या मूर्तीची पूजा विधीवत पूजा होईल. त्यानंतर ९.३० वा. रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीदरम्यान नांदगाव तिठा ते नांदगाव मोरयेवाडी श्रीराम मंदिर येथे आरती, नांदगाव गोसावी कुंभारवाडी श्रीराम मंदिर येथे आरती, ओटव,आयनल ,कोळोशी असलदे मार्गे नांदगाव तिठा ते तोंडवली बोभाटेवाडी श्री हनुमान मंदिर येथे आरती व नांदगाव तिठा येथे आगमन व नांदगाव तिठा येथे महाआरती होणार आहे. हिंदू बांधवांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










