
सावंतवाडी : चंदगड येथील बेवारस उच्चशिक्षित जानू धुमाले यांना सामाजिक बांधिलकी कडून जीवदान देण्यात आले आहे.सावंतवाडी रेणुका हॉटेल नजीक पायाला जखमा होऊन उन्हामध्ये व्याकुळ अवस्थेमध्ये पडलेल्या दुमाले याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंदन नाईक यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दिली होती.
यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम व रुपा मुद्राळे यांनी पोलिसांची मदत घेऊन बेवारस व्यक्तीला स्वच्छ करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जेवण देऊन त्याला त्याच्या राहत्या गावी चंदगड येथे पाठवण्याची व्यवस्था केली. ही व्यक्ती उच्चशिक्षित असून चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलते. परंतु घरातील सर्व व्यक्ती मृत्यू झाल्याची माहिती दिली त्यामुळेचं कदाचित त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचं दिसून आलं. सहकार्यासाठी रवी जाधव लक्ष्मण कदम व रुपा मुद्राळे यांनी पोलीस प्रशासन व डॉक्टर यांचे आभार मानले.










