सावंतवाडी शहरात स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम युध्दपातळीवर

Edited by: विनायक गांवस
Published on: December 15, 2025 15:39 PM
views 121  views

सावंतवाडी : वैशिष्ट्यपूर्ण निधी मधून शहरात मोक्याच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून  गेली बरीच वर्षे शाळा नं २ च्या बाजूला संरक्षक भिंत कोसळुन रस्ता अरुंद झाला होता. विद्यार्थी आणि नागरिक यांना येताना जाताना धोकादायक बनला होता. यावर युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी नगरपालिका प्रशासन यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. आजपासून या कामाला सुरुवात झाली असून ४ नवीन स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम सुरू झाले आहे. याबद्दल नगरपालिका विद्यूत विभाग कर्मचारी प्रदीप सावरवाडकर, दीपक म्हापसेकर, कंत्राटदार विजय सावंत यांचे श्री. सूर्याजी यांनी आभार मानले आहेत.