नेतर्डेत महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

Edited by:
Published on: December 06, 2025 17:03 PM
views 254  views

सावंतवाडी : तालुक्यातील नेतर्डे - खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी घरच्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना व पोलिसांना दिली.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, टी. टी. कोळेकर, संगीता बुर्डेकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरी हि पेडणे गोवा येथे बारावीत शिकत होती. तिच्या मागे आई वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे.