
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. राजवाडा येथील पाटेकर देवस्थानचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण शहरात ही रॅली काढण्यात आली. यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी उस्फुर्त व सकारात्मक प्रतिसाद देत शुभेच्छा दिल्या.
प्रचार रॅली दरम्यान व्यापारी तसेच नागरिकांचे शुभाशीर्वाद घेतले. यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, भाजप युवा नेते विशाल परब, सौ. वेदीका परब, शहराध्यक्ष तथा उमेदवार सुधीर आडीवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. ऋजूल पाटणकर, गोपाळ नाईक, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगांवकर, अमित गवंडळकर, दिपाली भालेकर, मेघा डुबळे, समृद्धी विर्नोडकर, ॲड. संजू शिरोडकर, दादू कविटकर, संध्या तेरसे, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, महेशर शेख, वीणा जाधव, शेखर गांवकर, गुरुनाथ पेडणेकर, रवी मडगांवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










