
मालवण : भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री आशिष शेलार मैदानात उतरले आहेत. मंत्री शेलार यांच्या उपस्थितीत भाजपने मालवण बाजारपेठेत भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मालवणात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. आज मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपाने प्रचार रॅली काढली. भरड येथून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत, रणजित देसाई, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, यासंह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










