लँड माफिया कोण ? केसरकरांनी जाहीर करावं

नगराध्यक्षांचा विजय निश्चित, गुलाल उधळायला केसरकरही असतील : पालकमंत्री नितेश राणे
Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2025 12:10 PM
views 168  views

सावंतवाडी : लँड माफिया कोण ? हे केसरकरांनी जाहीर कराव. नाव घेत नाहीत, बाण आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यावर उत्तर का द्याव ? तर अवैध व्यवसायिक कोणाला उमेदवारी दिली हे जाहीर करावं, चुकीच्या पद्धतीने कुणाला केसमध्ये गुंतवल जात असेल तर त्यावर एफीडेव्हीट झालंय. देशात, राज्यात संविधान चालत. आरोप करून चालत नाही, पुरावे द्यावे लागतात असं मत पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केल. तसेच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित विजयी होतील‌‌ असा विश्वास व्यक्त करत गुलाल उधळायला दीपक केसरकर आमच्यासोबत असतील अस विधान केलंय 

ते म्हणाले, भव्य अशी रॅली आम्ही काढली आहे. उद्याच मतदान सेवा करण्यासाठी व ५ वर्ष शहराच्या विकासासाठी मागत आहोत. ज्या राजघराण्यान शहराला ओळख दिली त्याचे ऋण फेडण्यासाठी ही संधी आहे. युवराज्ञींना मतदान म्हणजे पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना मतदान आहे. चारही शहरांना जास्तीतजास्त विकास करण्यासाठी आमचा हेतू आहे. वैयक्तीक उणी धुणी, हेवेदावे काढण्याची ही निवडणूक नाही‌‌ असं त्यांनी स्पष्ट केले.

तसेच राजघराण्यान सावंतवाडीला सुंदरवाडी बनवलं. रस्ते, पाणी, मोती तलाव शहाराला कुणी दिला ? ही वेळ राजकारण करायची नाही. राजघराण्यान अपेक्षा न ठेवता दिलं. ही वेळ परतफेड करण्याची आहे. त्या चष्म्यातून ही निवडणूक पाहायला हवी होती. राजघराण विकासाची जबाबदारी घेत असेल तर सत्ता देण आवश्यक आहे‌. दीपक केसरकर यांचा आशीर्वाद युवराज्ञींना आहे‌. गुलाल उधळायला देखील ते असतील असा विश्वास व्यक्त केला. तर राज्यातील प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांच्या सहीने होते. अजित पवारांनी अर्थमंत्री असलो तरी निधीचे निर्णय मुख्यमंत्री घेतात हे त्यांनीही जाहीर केलंय असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानावर केल. दरम्यान, लॅण्ड माफिया कोण ? हे केसरकरांनीही जाहीर कराव. नाव घेत नाहीत, बाण आमच्याकडे नाही. त्यामुळे त्यावर उत्तर का द्याव ? अवैध व्यवसायिक कोणाला उमेदवारी दिली हे जाहीर करावं, चुकीच्या पद्धतीने कुणाला केसमध्ये गुंतवल जात असेल तर त्यावर एफिडेव्हीट झालंय. देशात, राज्यात संविधान चालत. आरोप करून चालत नाही, पुरावे द्यावे लागतात. मी पालकमंत्री आहे, त्यामुळे तसं करण्याची कुणाची हिंमत नाही. चाबुक खिशातच असतो. दीपक केसरकर यांनी पॉझिटिव्ह दृष्टीने या निवडणुकीकडे बघाव. राजघराण्यातील व्यक्ती सत्तेत बसल्यास निश्चितच सगळे प्रश्न मिटतील. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले आदी उपस्थित होते.