
सावंतवाडी : युतीच सरकार राज्यात आहे. ती कायम रहावी तसंच ते प्रत्त्येक ठिकाणी असावी हे म्हणणाऱ्यांपैकी मी आहे आणि सर्वांकडून तशी अपेक्षा आहे असे मत आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दोन तारीख पर्यंत युती टिकावायची आहे. त्यामुळे आता काही बोलणार नाही या भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर दिले. लोकांना आमिष दाखवली जात आहेत. या धनशक्तीचे मोहजाळ भेदण्याची ताकद जनतेतच आहे. योग्य व्यक्तीला मतदान करून हे मोहजाल भेदाव असं आवाहन त्यांनी केलं. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, तब्येत ठीक नसल्याने व डॉक्टरांनी सल्ला दिल्याने शहरात फारसा फिरू शकलो नाही. प्रत्यक्ष लोकांपर्यंत गेलो नाही अशी पहिलीच वेळ आहे. लोकांना काही प्रबोधन दाखवली जातात. त्याला लोकांनी बळी पडू नये. सावंतवाडी व वेंगुर्ला शहराचा माझ्या राजकीय जीवनात मोठा वाटा आहे. त्यामुळे या शहरांचा अव्याहत विकास सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. ही लोकशाही आहे. आमिषाला बळी न पडता मतदान करावं. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकाम केलीत. काही विकासकाम सुरू आहेत. विकास कसा असतो हे डोळसपणे बघितले पाहिजे.
दरम्यान, माझ्या गैरहजरेती गैरसमज पसरवण चुकीचं आहे. राजघराण्याशी नेहमीच चांगले संबंध राहिलेत. मल्टिस्पेशालिटीला ४५ कोटी मंजूर झाले, त्यांच टेंडर, वर्क ऑर्डर झाली आहे. बदली जागा देण्याचा ठराव देखील कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. अशावेळी उरलेले पार्टनर सहीसाठी कबुल करत नाहीत, त्यावर ते निर्णय घेऊ शकले नाही. घातलेल्या अटी समोरील लोकांना मान्य नाहीत. तरीही अटी बदलेल्या नाहीत. मोती तलाव हा शहराचा आत्मा आहे. नगरपरिषद विरोधात याचिका आहे. केस असल्यामुळे तो निधी खर्च न होता माघारी गेला ही वस्तुस्थिती आहे. तलाव श बुजवला गेला तर शहराचा आत्मा निघून जाईल. त्यामुळे जनहीतासाठी तडजोड व्हायला हवी होती. मात्र, ती तडजोड झालेली नाही. त्यांच्या आदरापोटीच कधी टीका केली नाही. तर तलाव त्यांच्या मालकीचा झाला तर तलावाचा निर्णय ते घेतील. त्यामुळे सामाजिक हिताच्या प्रश्ननात तडजोड झाली पाहिजे असं मत व्यक्त केले.
दरम्यान, शहर शांत ठेवण्याच काम मी केलय. लोकांच ऐक्य हीच माझी कमाई आहे. विविध जाती धर्मांची लोक एकोप्याने नांदतात. मतांसाठी पैसे दिले जाण योग्य नाही. वाटली जाणारी रक्कम मोठी आहे. राजकीय करीअर संपवण्यासाठी हे कारस्थान असू शकत. जर पैसे घेतले असतील तर मतदान करताना मात्र आमच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी उपस्थित होते.











