
सावंतवाडी : जनतेच प्रेम संजू परब यांना विजयी करेल याची मला खात्री आहे. आमिष दाखवून पराभूत करण्याच काम इथे होत आहे. पक्षाला गरज असताना ते या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे फक्त तुमची साथ हवी आहे. संजू परब यांच्या प्रचार सभेला मी येणार नाही असं होणार नाही. संजना परब यांनी इथे नातं जपलं आहे. त्यामुळे आमिषाला जनता बळी पडणार नाही असे मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सावंतवाडीला आरोग्य सुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणलं. मात्र, सह्या न झाल्याने तो प्रकल्प रखडला. कोट्यवधीची जमीन राजघराण्याला सरकार देत होतं. फुकट जागा आम्ही मागीतली नाही. तलाव सुद्धा आमच्या मालकीचा म्हणन योग्य नाही. तलाव हे सावंतवाडीच नाक आहे. सध्या आजारपणामुळे मला फिरता येत नाही. याचा गैरफायदा घेऊन गैरसमज पसरवले जातायत. मात्र, आमचं पॅनल निवडणूकीत उभ आहे. मला चार वेळा आशीर्वाद दिलात तसाच आशीर्वाद शिवसेनेच्या २१ जणांना द्या असे आवाहन त्यांनी केले. भाजी मंडई, अंडर ग्राउंड पार्किंग, पर्यटन केंद्र, सुसज्ज कॉम्प्लेक्स, मटण मार्केट आदी उभी राहत आहेत. २४ तास पाण्यासाठी ५७ कोटींची नळपाणी योजना मंजुर होऊन काम सुरू आहे. त्यामुळे तुमची सेवा करण्यासाठी संजू परब, स्नेहा नाईक यांसह नगराध्यक्षांना विजयी करा असे आवाहन दीपक केसरकर यांनी केलं. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना चांगलं बोलता येत त्या तुमची चांगली सेवा करतील. विजयी मिरवणूक सहभागी होण्यासाठी मी स्वतः येईन असं आवाहन केलं.










