
सावंतवाडी : ही सभा वॉर्डची वाटत नाही तर जाहीर सभा वाटते. संजू परब यांचा विजय निश्चित झाला आहे. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम जवळून बघितल आहे. राणे कुटुंबाची सावली म्हणून संजू परब राहिलेत. युतीसाठी दीपक केसरकर, उदय सामंत आणि मी खूप प्रयत्न केले. मात्र, युती झाली नाही. संजू परबांमुळे जिल्ह्यातील रेट वाढला. म्हणून, मला स्टिंग ऑपरेशन करावे लागत. रेट कितीही वाढला तरी संजू परब यांचा विजय निश्चित आहे. त्यात तुमच्या सौभाग्यवतींचा वाटा मोठा असणार आहे. दीपक केसरकर व मी तुझ्यासोबत आहोत. माझ्या वाईट काळात उभा राहणारा एक माणूस संजू परब आहे. पैसे येतील अन् जातील पण गेलेली इज्जत परत येणार नाही हे स्व. बाळासाहेब ठाकरेंच वाक्य आहे असे मत शिवसेना आमदार निलेश राणेंनी व्यक्त केल.
ते म्हणाले, राजघराण्याचा आम्हालाही आदर आहे. पण, संजू परब मुद्यावर बोलत आहे. मोती तलाव गेला तर बसायचं कुठे ? अधिक बोलणार नाही. पण, निलेश राणे संजू परब यांच्या सोबत आहे. नारायण राणेंवर टीका करणारा माणूस बाहेरून येऊन पैसे वाटतोय.
वाटप होणारे पैसे येतात कुठून ? हा प्रश्न आहे. कितीही काही झालं तर ॲड. निता सावंत-कविटकर नगराध्यक्ष होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्यांनी आमदार, खासदार व्हायचं ते कार्यकर्त्यांची निवडणूक लढवत आहेत. प्रजा विरूद्ध राजा असं सावंतवाडीच चित्र झालं आहे असाही टोला हाणत ही निवडणूक जिंकणार असा विश्वास व्यक्त केला.. दीपक केसरकर यांच्यात निधी खेचून आणण्याची ताकद आहे. मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीत भगवा फडकवायचा आहे. २१-० होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. सावंतवाडी शहर फक्त दीपक केसरकर जपू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










