
सावंतवाडी : भ्रष्टाचार मुक्त हा भाजपचा फक्त सुविचार आहे. सर्वाधिक भ्रष्टाचार भाजपच्या राज्यात होतोय. निलेश राणेंनी भाजपचा पर्दाफाश केला त्यावर भाजप काहीही ॲक्शन घेणार नाही. मागेही विनोद तावडेंना पैशांसह धरलेलं. त्यावर काहीही झालेलं नाही. सावंतवाडीतही पैशांच वाटप होत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कल्पना दिलीय. सरकारी यंत्रणा कमी पडली तर आम्ही धाड टाकू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी दिला.
ते म्हणाले, सध्या अधिकारी भाजपच्या राजकारण्यांना घाबरतात. सरकारी अधिकारी जास्त डोकं चालवत नाही. जर चालवल तर भाजप सरकार खाली पडेल असा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारच्या काळात गुन्हा करणारा सुटतो. जो गुन्हा दाखवतो त्याला अडकवल जात अशी पद्धत आहे. जर प्रकार थांबले नाही तर आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल असा इशाराही दिला. तसेच सीमा मठकर या जनतेतील उमेदवार आहेत. सामान्य माणसाला जनता कौल देते. सावंतवाडीकर त्यांना निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, नगराध्यक्षपदासाठी उमेदवार सीमा मठकर, चंद्रकांत कासार, निशांत तोरसकर , उमेश कोरगावकर, साई कल्याणकर आदी उपस्थित होते.










