
सावंतवाडी : विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार म्हणून वल्गना करणाऱ्या भाजपच्या मतपरिवर्तन करण्याच्या आर्थिक खेळीची भांडाफोड निलेश राणेंनी केली. सावंतवाडीत देखील हे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार न थांबल्यास सावंतवाडीतही भांडाफोड करावी लागेल असा इशारा उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिलाय.
ते म्हणाले, राजघराण, विकासाच्या मुद्यावर मत मागणाऱ्यांच खरं चित्र समोर आले आहे. पोलिस प्रशासनाने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे बारकाईने लक्ष द्यावे, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करावं. जर यावर आळा घातला नाही तर सावंतवाडीतही निलेश राणेंसारखी भांडाफोड करावी लागेल असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला आहे. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सीमा मठकर, निशांत तोरसकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते










