
सावंतवाडी : मोती तलावात काम करताना परवानगी घ्यावी लागते. कारण, याबाबत राजघराण्याकडून कोर्टात याची दाखल आहे. कोर्टात ही बाब असून त्यावर न्यायालय निर्णय देईल. मोती तलाव सरकारच असून ते नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. मोती तलाव आमचा श्वास आहे. तो गेला तर आम्ही गुदमरून मरू अस मत कॉग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केले. तसेच एका मतासाठी १० हजार देण्याची तयारी काहींची आहे. हा माणसाचा रेट लावला जातोय हे विष असून ते तुम्ही स्वीकारू नका, असंही आवाहन त्यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
ते पुढे म्हणाले, सावंतवाडीत अनेक वर्ष काम केल. तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून काम केल. महाविकास आघाडी व्हावी अशी अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील केले होते. मात्र, ती झाली नाही त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमचे १७ उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी दिली. सावंतवाडी शहराचा प्लान त्यावेळी केला होता. आर्किटेक्ट नसेल तर घर बांधता येत का ? पार्किंगसह इतरही गैरसोय शहरात आहे. त्यामुळे त्यावेळी बनवलेल्या मास्टर प्लानचा विचार होणं आवश्यक आहे. आमची सत्ता आल्यास त्याचा अवलंब करणार आहोत. पाणीपट्टी, घरपट्टी ५० टक्के माफ करण्याचा आमचा विचार आहे. सत्ता आल्यास निश्चितच शहरवासीयांना चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ अस ते म्हणाले. तसेच मल्टीस्पेशालिटीच भुमिपूजन झालं असून जागेचा प्रश्नात ते अडकले आहे. त्यामुळे आयुर्वेद कॉलेजची जागा आम्ही सुचवली. मात्र, त्याकडे लक्ष दिलं गेलं नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.साक्षी वंजारी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना सर्व नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जिंकतील असा दावा केला. स्वबळाचा निर्णय घेतला तो योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले. 'डोअर टू डोअर' आम्ही प्रचार केला असून निश्चितच कॉग्रेसला यश मिळेल अस मत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, राजन म्हापसेकर, माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, संजय लाड, अरूण भिसे आदीसह कॉग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










