
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे उमेदवार हर्षा जाधव व बासीत पडवेकर यांनी जोरदार प्रचारास सुरुवात केली. घरोघरी जात त्यांनी प्रचारावर भर दिला. यावेळी उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत - कविटकर व आपला विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वावर आम्ही काम करू अस मत व्यक्त केले. यावेळी प्रभाग क्रमांक १ चेउमेदवार बासीत पडवेकर, हर्षा जाधव, माजी नगरसेवक नासिर शेख, सचिन साटेलकर, शेख, खान आदी उपस्थित होते.










