
सावंतवाडी : शहरात सध्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली असून शहरात २ डिसेंबर २०२५ रोजी विविध प्रभांगात मतदान होणार आहे. या अनुषंगाने शहरातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडावे याकरितां तसेच शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, मतदानादिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येत आहे. तरी याची शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केलंय .










