
सावंतवाडी : भाजपकडून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सुनीता पेडणेकर यांनी प्रभाग क्रमांक २ मध्ये जोरदार प्रचार केला. श्री. साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंसह भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २ मध्ये त्यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी संतोष तळवणेकर, दिपक सावंत, ज्ञानेश्वर पारधी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. साळगावकर म्हणाले, जनतेची साथ आम्हाला आहे. यापुढील जीवन जनतेसाठी समर्पीत करत असून वचन पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










