युवराज्ञींचा हटके प्रचार !

भाजपचा प्रभाग १ मध्ये झंझावात
Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2025 13:27 PM
views 48  views

सावंतवाडी : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये हटके प्रचार केला. दीपेश शिंदे यांनी आपल्या खास स्टाईलने मतदारांच लक्ष वेधून घेतल. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्राचारात सहभागी झाले. 

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक राजू बेग, दिपाली भालेकर यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, उमेदवार राजू बेग, दिपाली भालेकर, संदिप नेमळेकर, मिसबा शेख आदींसह भाजप  पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. बेग यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सावंतवाडी राजघराण्याची आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.