सामंत ट्रस्टतर्फे गरजू रुग्ण - होतकरू विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान

Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2025 13:22 PM
views 15  views

सावंतवाडी : आज सावंतवाडी येथील कै डॉ भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना व होतकरू विद्यार्थ्यिनींना कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ह्रदयरोग आणि रक्तदाबाच्या आजाराने पिडित तांबोळी येथील रामचंद्र तांबोळकर, कर्करोगाने पिडित शेर्ले येथील अंकुश धुरी,चराठे येथील प्रमिला जांभळे, कर्करोगाने पिडित सटमटवाडी बांदा येथील अनंत सावंत,पेंडूर येथील होतकरू विद्यार्थिनी सुयेशा चव्हाण,पेंडूर येथील होतकरू विद्यार्थिनी ज्योती मुणगेकर, सावंतवाडी येथील प्रवीण मांजरेकर,पेंडूर येथील होतकरू विद्यार्थिनी विजया गावडे आणि परूळे येथील होतकरू विद्यार्थिनी तृषा वारंग अशा नऊ गरजू व्यक्तींना हे धनादेश प्रदान करण्यात आले.