
सावंतवाडी : ७ डिसेंबर २०२५ सशस्त्रसेना दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघ, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्हास्तरीय मिनी मॅरथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा "आमची धाव जिंकण्यासाठी आमचा सलाम सशस्त्र सेनेसाठी या देशभक्तिपर घोषवाक्याने सजलेली आहे.
मोती तलाव परिसरात सकाळी ६:४५ वाजता सुरु होणारी ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन तसेच आरोग्यवर्धनाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे स्पर्धेची नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/vFekW2XgDbfT5e178 ह्या लिकचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे आणि याकरिता अगदी माफक नोदणी शूल्क रु. 30/-मात्र एवढे आकारले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये क्रीडास्पर्धेची भावना, राष्ट्रभक्तीची जाणीव आणि सशस्त्र दलाविषयी आदर निर्माण करणे हे आहे. विशेषतः सशस्त्र दलातील जवानांनी बजावलेल्या अमूल्य सेवेला अभिवादन म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे निवृत्त सैनिक संघाकडून सांगण्यात आले.
या स्पर्धेत खालील वयोगट सहभागी होण्यास पात्र असतील, 11 वर्षाखालील मुले आणि मुली तलावाची 1 फेरी या वयोगटासाठी दि. 07/12/2014 नंतर जन्मलेले स्पर्धकच पात्र असतील. 15 वर्षाखालील मुले आणि मुली तलावाची 1 फेरी या वयोगटासाठी दि. 07/12/2010 ते दि. 06/12/2014 पर्यत जन्मलेले स्पर्धकच पात्र असतील. 18 वर्षाखालील मुले आणि मुली तलावाच्या 2 फेऱ्या- दि. 07/12/2007 ते दि. 06/12/2010 पर्यंत जन्मलेले स्पर्धक पात्र असतील. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशिस्तीपत्रकेप्रथम परितोषिक रोख रक्कम रु. 1500/-, सन्मानचिन्ह, आणि प्रशिस्तीपत्र द्वितीय परितोषिक रोख रक्कम रु.1000/-, सन्मानचिन्ह, आणि प्रशिस्तीपत्र तृतीय परितोषिक - रोख रक्कम रु.750/-, सन्मानचिन्ह, आणि प्रशिस्तीपत्र चौथे परितोषिक रोख रक्कम रु.५००/-, सन्मानचिन्ह, आणि प्रशिस्तीपत्र पाचवे. परितोषिक रोख रक्कम रु.५००/-, सन्मानचिन्ह, आणि प्रशिस्तीपत्र मार्गावर वैद्यकीय मदत, पाणी स्टॉल, पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात ही स्पर्धा पार पाडण्याचे सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सशस्त्रसेना दिनानिमित्त आयोजित ही मिनी मॅरथॉन विद्यार्थ्यांसाठी केवळ क्रीडास्पर्धा नसून भारतीय सैनिकांच्या शौर्याला वाहिलेली एक अभिवादनात्मक धाव ठरणार आहे. ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्वासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास निवृत्त सैनिक संघाने व्यक्त केला आहे.










