
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीच्या चर्चा सुरू असताना तसेच भाजप आणि शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत दाखल झालेत. भोसले सैनिक स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थित राहिलेत. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोंसले उपस्थित होते.










