SPK चा विद्यार्थी नेमबाजीतील सुवर्णवीर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 07, 2025 17:55 PM
views 16  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे २७ ऑक्टोबर ला रोजी नागपूर येथे झालेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने शानदार कामगिरी करत त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. ४०० पैकी ३७९ इतक्या उच्च गुणांच्या जोरावर तो सुवर्णवीर ठरला. 

या उल्लेखनीय विजयानंतर आयुष आता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत करणार असून त्याच्याकडून भक्कम प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयुषच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले (राजेसाहेब), चेअरमन सौ. शुभदादेवी भोसले (राणीसाहेब), विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक डॉ. शामराव सावंत, सदस्य सतीश सावंत व जयप्रकाश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, मदर क्वीन्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर तसेच प्रा. एम. ए. ठाकुर व पालक दत्तप्रसाद पाटणकर यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

आयुषने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३७८ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच जिल्ह्यातील ‘गुणवंत खेळाडू’ हा मानाचा सन्मानही त्याला प्राप्त झाला आहे.

आयुषची जिद्द, कठोर परिश्रम आणि वडिल दत्तप्रसाद पाटणकर यांचे प्रोत्साहन यांच्या जोरावर त्याची ऑलिम्पिक नेमबाजी प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.