
सावंतवाडी : महाराष्ट्रात महायुतीच राज्य आहे. त्यामुळे युतीतून लढण आवश्यक होत. पण, भाजपन स्वबळाचा निर्णय घेतला असल्याने आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढवू, आमचीही तयारी आहे. या निवडणुका आम्ही जिंकू असा विश्वास माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्री नितेश राणेंनी तसं बोलणच चुकीचे आहे. महायुती म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत. त्यांचेही उमेदवार महायुती म्हणून निवडून आलेत असंही श्री. केसरकरांनी सांगितले. तसेच एकत्र न लढल्याने उबाठाच्या जागा आल्यास भाजपाचा निर्णय त्याला जबाबदार राहील असंही त्यांनी स्पष्ट केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीच राज्य आहे. त्यामुळे युतीतून लढण आवश्यक होत. पण, भाजपन स्वबळाचा निर्णय घेतला असल्याने आम्ही देखील स्वबळावर निवडणूक लढवू, आमचीही तयारी आहे. या निवडणुका आम्ही जिंकू, पालकमंत्री यांनी तसं बोलणच चुकीचे आहे. महायुती म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत. त्यांचेही उमेदवार महायुती म्हणून निवडून आलेत. तसेच लोकांच्या मनात असेल असा २४ तास जनतेसाठी काम करणारा उमेदवार आम्ही देणार आहोत. प्रशासनातील माहिती असणारा उमेदवार आमचा असेल. त्यामुळे लोकहिताची काम होतील, प्रशासन चांगलं चालेल. नगरपरिषदेत मी कधी राजकारण केलं नाही, करणार नाही. न.प. हे माझं घर समजतो. लोकप्रतिनिधी नसल्याने कारभारावर परिणाम होतो. सावंतवाडी आणि वेंगुर्लेत निश्चित आम्हाला यश मिळेल. मालवणमध्येही आम्ही जिंकू, कणकवलीत काय रणनीती आखायची हे तिथले प्रमुख ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीचे आमदार म्हणून आम्ही निवडून आलो आहोत. मात्र, प्रत्येकाची चिन्ह वेगळी होती. दोन शिवसेना आणि एक भाजप असे उमेदवार निवडून आलेत. यातून स्वबळावर लढण्याची म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. निलेश राणेंशी मी बोललो आहे. माझ्यासह ते देखील तडजोडीस तयारीत होते. पदावरून हा वाद झालेला नाही. हा निर्णय भाजपने घेतला आहे. आम्ही सुद्धा स्वबळावर निवडणूका लढवणार आहोत. त्यात चांगलं यश आम्हाला मिळेल, असा विश्वास व्यक्त दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदेंच योगदान जनता विसरलेली नाही. आमच योगदान केलेली विकासकामे यावर आम्ही मतदारांकडे जाणार आहोत. कुणाच्या विरोधात चुकीची विधान होणार नाही याची काळजी घेऊ असं मत व्यक्त केले.










