
सावंतवाडी :सावंतवाडी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सावंतवाडीत करण्यात आलं. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, भाजप पक्ष कार्यालयाच आज उद्घाटन झालं. याचा उपयोग निवडणूकीसह जनसामान्यांना देखील होणार आहे. जन सुविधा कक्ष देखील इथे उभारण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने लढणार आहे. आतापर्यंतच्या भाषणाला माझं 'मम' आहे. कमळ चिन्हाचा उमेदवार आपला असणार आहे. खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा भाजपमय राहिला आहे. तो यापुढेही राहील अस प्रतिपादन त्यांनी केलं.










