
सावंतवाडी : सावंतवाडी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सावंतवाडीत करण्यात आलं. युवा नेते विशाल परब यांनी या कार्यक्रमात प्रास्ताविक केले. आचारसंहिता लागू झाली आहे. कोकणचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री आहेत. हे कार्यालय आपलं आहे. तुमच्यासाठी ते २४×७ खुलं आहे. ३ डिसेंबरला गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. तसेच आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहे. फिजीशीयन रुग्णालयात सेवा देत आहे. जनसेवेसाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, शैलेंद्र दळवी, वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, संदिप गावडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










