
सावंतवाडी : निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही बांधणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली. दोनवेळा महायुतीतून लढलो. मात्र, कार्यकर्त्यांची निवडणूक स्वबळावर व्हावी अशी आहे अपेक्षा आहे. आपल्याकडे सक्षम उमेदवार असल्याच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितलं. सावंतवाडी येथील पक्ष कार्यालय कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, शैलेंद्र दळवी, वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, संदिप गावडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










