
सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील माजगाव, शिरोडा नाका, मोर डोंगरीजवळ उभारण्यात आलेल्या भाजपा सिंधुदुर्ग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या, बुधवारी ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या निमीत्ताने दिमाखदार सोहळ्याच आयोजन करण्यात आले आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी आणि पक्षीय कामकाजाला गती देण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेताताई कोरगांवकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष, सर्व मोर्चा/आघाडीचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी राहणार आहे. तसेच, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडल कार्यकारणीचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.













