आजगाव तांबळवाडी येथे रुग्णवाहिकेस अपघात

Edited by: विनायक गांवस
Published on: November 04, 2025 17:25 PM
views 16  views

सावंतवाडी : मळेवाडवरून शिरोडाच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. आजगाव (तांबळवाडी) येथे गेली असताना वडाच्या झाडाला धडकून हा अपघात झाला. यात  रुग्णवाहिकेतील चालक    जखमी झाला असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने शिरोडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथे नेण्यात येणार आहे. सुदैवाने या रुग्णवाहिकेत अन्य कोणीही नव्हते. ही घटना आज सायंकाळी चार साडे तीनच्या सुमारास घडली.