
सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य, आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून विंधन विहिर मंजूर करण्यात आली होती. या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख श्री. परब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. परब म्हणाले, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकाम होतात. मात्र, ते कधी त्याची प्रसिद्धी करत, श्रेय घेत नाहीत. सावंतवाडीतील विकासकाम हे फक्त दीपक केसरकरच करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दीपक केसरकर व देव्या सुर्याजी यांचे आभार मानण्यात आले. या विंधन विहिरीमुळे उन्हाळ्यात रूग्णालयात होणारी पाण्याची गैरसोय दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. निखिल अवधूत, प्रेमानंद देसाई, अजय गोंदावळे, परिक्षीत मांजरेकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, अर्चित पोकळे, गौतम माठेकर, पंकज बिद्रे, शुभम बिद्रे, शुभम सावंत, गौतम सावंत, वसंत सावंत, मंदार सावंत, ज्ञानेश्वर पाटकर, राकेश पवार आदींसह उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका, अधिकारी , कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
   
                    
   


 
      
   
   
  
 
  
  
  
  
  	
   
   



               



