सावंतवाडीत ५ नोव्हेंबरला 'हे चांदणे फुलांनी'

Edited by: विनायक गांवस
Published on: November 02, 2025 12:25 PM
views 36  views

सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी  व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त "हे चांदणे फुलांनी..." जुन्या - नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यालयाचा माजी विद्यार्थी व कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा फेम सागर मेस्त्री (मुंबई) आपले विशेष सादरीकरण या कार्यक्रमात करणार आहे. 

बुधवार दि. 5 नोव्हेंबरला सायंकाळी ठीक ६ वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान  सावंतवाडी (गार्डन) येथे ही मैफिल रंगणार आहे.  हा कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाच्या  कु वर्षा देवण - धामापुरकर, ॲड सिद्धी परब, कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर, कु केतकी सावंत, कु निधी जोशी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ हे विद्यार्थी‌ या कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री व  (हार्मोनियम) , किशोर सावंत व कु सिद्धेश सावंत, कु निरज मिलिंद भोसले (तबला), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री (सिथेसायझर), कु दुर्वा सावंत (गिटार) व सूत्रसंचालन श्री संजय कात्रे  तर ध्वनी संयोजन श्री सुभाष शिरोडकर, बांदा करणार आहेत. गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी, सद्गुरु संगीत विद्यालय, पालकवर्ग व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.