
सावंतवाडी : भाजप देशात एक नंबर पक्ष आहे. तो नंबर टिकवून ठेवण्यासाठी असंख्य कार्यकर्ते पक्षात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून लोक पक्षात येत आहेत. शहराचा विकास करण हेच आमचे उद्दिष्ट असून सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. परब म्हणाले, सावंतवाडीसाठी भाजप निधी मोठ्या प्रमाणात आणेल याचा विश्वास लोकांना आहे. म्हणून, लोक भाजपकडे येत आहे. युवा सेनेचे प्रतिक बांदेकर देखील पक्षात आलेत. आमचा उद्देश हा विकासाचा आहे. शहर विकासासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. पुणे, बारामतीच्या तुलनेत आम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे कोणावर टीका न करता विकासाच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. सावंतवाडीतून महामार्ग गेला असता तर निश्चितच फायदा झाला असता. भविष्यात हे पर्यटक सावंतवाडीत कसे येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोणावर टीका करण्यापेक्षा विकास हे भाजपचे धेय्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, प्रसाद अरविंदेकर, केतन आजगावकर, अमेय पै आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते










