
सावंतवाडी : शिवसेनेच्या धक्क्याला उत्तर देत भाजपने शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.
लाखे वस्ती येथील शिवसेनेच्या परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी आदींसह शेकडोंनी आज भाजपात प्रवेश केला. युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, प्रसाद अरविंदेकर, केतन आजगावकर, अमेय पै आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते










