
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढील दिवाळीपर्यंत सावंतवाडीत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची मोठी घोषणा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केली आहे. दिवाळी निमित्त आयोजित 'अभंग रिपोस्ट' कॉन्सर्टदरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे.
ते म्हणाले, येथील सर्वात मोठा प्रश्न आरोग्याचा आहे. जनतेला आवश्यक तेवढ्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कॉन्सर्टचा प्रारंभ झाला. यावेळी श्री. सावंत व श्री. दळवी यांनी मनोगत व्यक्त करत विशाल परब यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच रिलोत्सव २०२५ च्या विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध गायक प्रणय शेट्ये, सौ. वेदिका परब, भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, ॲड परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, दिलीप भालेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगाकर, दिपाली भालेकर, ॲड अनिल निरवडेकर, केतन आजगावकर, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर आदी उपस्थित होते.










