
सावंतवाडी : १५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य साधून श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ठीक १० वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी सकाळी १० ते रात्रौ ०८ या वेळेत वाचकांसाठी खुले रहाणार आहे. तरी अधिकाधिक वाचन प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.