
सावंतवाडी : चिरेखाणीवरील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित थॉमस बा (रा. झारखंड, वय २१) याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
एका चिरेखाणीत काम करणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर त्याच चिरेखाणीतील कामगाराने ३ ऑक्टोबरच्या रात्री बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार झाला होता. या मुख्य आरोपीस सावंतवाडी पोलिसांनी गोव्यातून रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.










