
सावंतवाडी : शनिवारी मध्यरात्री सरमळे नांगरतास येथे बिबटा भक्षाच्या शोधात थेट अंगणात आला. येथील सखाराम माधव यांच्या घराच्या अंगणात हा बिबट्या येऊन गेल्याने भितीच वातावरण निर्माण झाले आहे.
भर वस्तीत असणाऱ्या घराच्या अंगणात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये या बिबट्याच्या मुक्त संचार कैद झाला. अंगणात असणाऱ्या दोन कुत्र्यांची शिकार करण्यासाठी दबक्या पावलांनी येणारा बिबट्या पाहताच दोन्ही कुत्र्यांनी जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. हा आवाज ऐकून सखाराम माधव हे बाहेर आले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. समोर अचानक बिबट्याला पाहताच माधव हेही घाबरून गेले. सरमळे नांगरतासवाडी हा भाग जंगलमय असल्यामुळे जंगली जनावरांचा वावर असतोच. मात्र, थेट हे प्राणी मानवी वस्तीत घुसत असल्याने या परिसरात भीतिचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने योग्य ती उपाय योजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.










