मंगेश तळवणेकरांनी घेतली राणेंची भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: October 05, 2025 17:10 PM
views 305  views

सावंतवाडी : माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी अनेक वर्षानंतर भेटलेल्या मंगेश तळवणेकर यांची आपुलकीने चौकशी केली. तसेच काही काम असल्यास अवश्य हाक मार असे आश्वासित करून शाबासकीची थाप दिली. यावेळी लक्ष्मण देऊलकर, रामकृष्ण परब, नारायण कारीवडेकर आदी उपस्थित होते.