
सावंतवाडी : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या डोंगर दऱ्यातील चौकुळ म्हाराठी बेरडकी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहील होत. या भागाचा भाजपचे युवा नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली कायापालट होत आहे.
पक्का रस्ता, वीज आणि पक्की घरे नसलेल्या या वाडीत विकासाची किरणे पोहोचायला बराच काळ लागला. येथील रहिवासी अक्षरशः अंधारात जीवन जगत होते. मात्र, संदीप गावडे यांनी या वाडीचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. या वाडीपर्यंत काँक्रिटचा पक्का रस्ता तयार झाला आहे. ज्यामुळे मोठा अडथळा दूर झाला. संपूर्ण रस्त्यावर स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आल्यामुळे वाडीतील अंधार कायमचा दूर झाला आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून सरपंच गुलाबराव गावडे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि संदीप गावडे यांच्या सहकार्यामुळे येथील अनेक कुटुंबांना पक्की घरे मिळाली. कच्च्या घरांची जागा आता मजबूत आणि सुंदर घरांनी घेतली आहे. हा दृष्टीकोन या वाडीच्या विकासासाठी अत्यंत प्रभावशाली ठरला आहे.