
सावंतवाडी : नेमळे ब्रिज खालील रेल्वे ट्रॅकवर आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उदयभानू विजय सावळ (वय ३५, रा. मळगाव, सावळ वाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सावळ हे अविवाहित होते. त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय मुळीक आणि त्यांचा स्टाफ तातडीने घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.










