
सावंतवाडी : भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेमध्ये 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. प्रारंभी बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विजय नेमलेकर व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या अर्ध्य पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर सभागृहात बौद्धाचार्य मिलिंदने मळेकर यांच्या नेतृत्वाखाली त्रिशरण पंचशील म्हणून धार्मिक कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जिल्हा संघटक मानसी कदम यांनी प्रास्ताविक करून बौद्ध महासभेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या धार्मिक सोहळ्याचे महत्त्व विशद केले. यानंतर केंद्रीय शिक्षक अशोक कदम जिल्हा संघटक ममता जाधव तालुका सरचिटणीस चंद्रशेखर जाधव यांनी धर्मांतराचे महत्त्व सांगून बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन का केले याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर प्रियदर्शनी सुनील जाधव, भावना अनंत कदम ,मीरा मिलिंद नेमळेकर ,कविता लक्ष्मण निगुडकर अश्विनी चंद्रशेखर जाधव ,गौतमी बुधाजी कांबळे, सुवर्णा सुधीर तेंडुलकर ,मनश्री मोहन जाधव, अनिशा यशवंत जाधव, शिवानी लतेश पवार, जयश्री पाटणकर,ज्योती जाधव,निधी कांबळे,संपदा कदम,जागृती जाधव, वर्षा कदम, मिलिंद नेमळेकर,दिलीप जाधव,इत्यादींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा जाधव यांनी केले तर आभार सुनील जाधव यांनी केले.










