
सावंतवाडी : मळगाव - कुंभार्ली येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सांबराचा जागीच मृत्यू झाला. नर जातीच हे सांबर होत. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
मळगाव चॉकलेट फॅक्टरी समोर झाराप-पत्रादेवी महामार्गावर हा अपघात घडला. वाहनाची ठोकर लागल्याने ते सांबर गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी वनविभागाचे पथक दाखल झाले. मात्र, तत्पूर्वी सांबराचा मृत्यू झाला होता. वनविभागाच्या टीमला विलंब झाल्याने ग्रामस्थांनी नाराजीही व्यक्त केली. यानंतर पंचनामा करत वनविभागाने पुढील सोपस्कार पार पाडले. यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.










