
सावंतवाडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा असलेल्या १०० व्या विजयादशमी सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची उत्कट भावना विशाल परब यांनी व्यक्त केली आहे. संघाच्या संचलन सोहळ्यात श्री. परब यांनी सहभाग घेतला.
एका पणतीची प्रखर राष्ट्रवादाची धगधगती मशाल होताना पाहणे अभिमानाचे आणि आनंदाचे आहे अशा भावना विशाल परब यांनी व्यक्त केल्या. शताब्दीकडे पोहोचलेल्या संघाच्या प्रवासात तन, मन, धनपूर्वक राष्ट्रसमर्पित केलेल्या हजारो ज्ञात-अज्ञात स्वयंसेवकांचा असीम त्याग आणि अनेकांच्या रुधीरबलिदानातून हा केशरी ध्वज अधिकाधिक तेजोयुक्त होत विश्वावर फडकत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि भगीरथासम अहर्निश ध्येयसाधना करणाऱ्या सर्व ज्येष्ठ स्वयंसेवकांचे त्यांनी या शुभप्रसंगी स्मरण करून त्यांच्या स्मृतींना प्रणाम केला. शताब्दी वर्षाच्या सोहळ्यानिमित्त सहभागी होण्याची संधी ही मागील अनेक जन्माची पुण्याई असल्याचे त्यांनी नमूद केले.










