‘मोबाईलचा दुरुपयोग टाळा’ वर प्रबोधनात्मक कार्यक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2025 15:29 PM
views 103  views

सावंतवाडी : नेमळे हायस्कूल येथे उद्या अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या वतीने ‘मोबाईलचा दुरुपयोग टाळा’ या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. नेमळे हायस्कूल, नेमळे येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. नकुल पार्सेकर उपस्थित राहणार असून प्रमुख समुपदेशक म्हणून अर्पिता वाटवे (महिला व बालक विशेष सहाय्यता कक्ष, पोलीस स्टेशन आवार, सावंतवाडी)  ह्या मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. कल्पना बोटेळेकर (मुख्याध्यापिका) व सौ. मानसी परब (सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला जिल्हाध्यक्ष - इंटरनॅशनल ह्युमन राईट वेलफेअर असोसिएशन) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा योग्य वापर, तसेच सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येणार असून विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.कार्यक्रमाचे आयोजन अटल प्रतिष्ठानच्या पुढाकाराने करण्यात आले असून, समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सजगतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संस्थेचा हेतू आहे