सेनेच्या जिल्हा सचिवपदी परिक्षीत मांजरेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2025 13:40 PM
views 125  views

सावंतवाडी : शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी सावंतवाडी येथील परिक्षीत मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले. 

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जोपासत त्याचा प्रसार आणि प्रचार पक्षवाढीसाठी करावा अशी आशा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केली‌. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, सचिव उमेश आरोलकर, सत्यवान बांदेकर, प्रथमेश सावंत, विनोद सावंत, प्रशांत साटेलकर, सुजीत कोरगावकर, आबा केसरकर आदी उपस्थित होते.