
सावंतवाडी : माजगाव सातेरी मंदिर येथे माजगाव नाईकवाडा ग्रामस्थांनी केलेला महिषासुरमर्दिनी आणि छ. शिवाजी महाराज भेट सीन खास आकर्षण ठरला. नाईकवाडा ग्रामस्थांनी सातेरी देवीला नमन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी नाईकवाड्यातील सर्व लहान थोर मंडळी उपस्थित होती. उद्घाटन झाल्यानंतर बायकांनी फुगडी घातली त्यानंतर रेकॉर्ड डान्स, वेशभूषा लहान मुलांनी केलेल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. वाड्यातील भजन मंडळींनी भजनाचा जागर करून कार्यक्रमाची सांगता केली.