सावंतवाडीत आज 'मेघ मल्हार'

Edited by: विनायक गांवस
Published on: September 29, 2025 11:01 AM
views 538  views

सावंतवाडी : माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीनं माजी मंत्री, आमदार दीपकभाई केसरकर पुरस्कृत स्वप्नील पंडित प्रस्तुत 'मेघ मल्हार' या मराठी आणि हिंदी गीतांच्या सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आत्मेश्वर मंदिर माठेवाडा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संगीतप्रेमींसाठी हा एक अनोखा आणि सुरेल नजराणा असणार आहे. हा विशेष कार्यक्रम सोमवार, दिनांक 29/09/2025 रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल. यात गायक अनुज प्रताप आणि धनराज सरतापे हे आपल्या गायकीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका अमृता दहीवेलकर यांचाही सहभाग यात असणार आहे. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन दीप काकडे करणार आहेत. 'मेघ मल्हार' या सुरेल सोहळ्याचे संयोजक स्वप्नील पंडित असून त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. 'मेघ मल्हार' ऑक्रेस्ट्राची उत्तम संगीत साथ या कार्यक्रमाला चार चाँद लावणारं असून मराठी आणि हिंदी चित्रपटांतील निवडक गीतांची ही सुरेल मैफल निश्चितच रसिकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरेल. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाने केले आहे.