
सावंतवाडी : कोलगाव आयटीआय परिसरातील कांजरकोड ओहाळात मगरींन दर्शन दिली. स्थानिकांसाठी ही धोक्याची घंटा असून या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदी - ओहाळाजवळ रोज जनावर, कपडे धुवायला तसेच शेतातील कामानिमित्त ग्रामस्थ येजा करतात. यात मगरीची वाढती उपस्थिती लक्षात घेता नागरिकांनी वनविभागाने तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, अलीकडेच पावसामुळे ओहाळातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून मगर पकडावी. तसेच परिसरात इशारा फलक लावून नागरिकांना सावधानतेचा इशारा द्यावा, अशीही मागणी केली आहे.










