असलदेत सेवा सप्ताहानिमि‌त्त वृक्ष लागवड

असलदे सोसायटीचा उपक्रम
Edited by:
Published on: September 21, 2025 20:06 PM
views 98  views

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताहाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार श्र.  रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असलतेच्यावतीने पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ येथे वृक्ष लागवड चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन प्रकाश परब, खरेदी विक्री संचालक पंढरी वायंगणकर, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे, राजेंद्र राणे, परशुराम परब, विठ्ठल खरात, शामराव परब, प्रशांत परब, प्रविण डगरे, बाबाजी शिंदे, दिनेश शिंदे, मधुसुदन परब, प्रकाश वाळके, सत्यवान गाडी, मुख्याध्यापिका श्रीमती सावंत, सोसायटी सचिव अजय गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.